कलाकारांना व्यक्त होण्यासाठी हक्काची जागा – Baramati.org

कोल्हापूरला कलापूर म्हणून जागतिक नकाशावर घेऊन जायचे छत्रपती शाहू महाराजांचे स्वप्न भवानी सामाजिक संस्थे ला पूर्ण करायचे आहे. मराठी मातीची जाण आणि ओळख रोमारोमांत भिनलेले कोल्हापूर कायमच कला, साहित्य, चित्रपट या क्षेत्रांमध्ये अग्रेसर राहिलेले आहे. भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथय्या असो किंवा जगाला वास्तववादी चित्रपटांची ओळख करून देणाऱ्या तांबडी माती सारख्या कलाकृती या कोल्हापूरच्या माती ने जगाला दिलेल्या आहेत. आणि या कलाकृतींचा गाभा आहेत ते म्हणजे करवीरनगरीचे अनेक प्रतिभावंत कलाकार. महाराष्ट्राला अशा अनेक कलावंतांचा वारसा लाभलेला आहे ज्यातून अनेक कल्पना रुजून त्याची सृजनशील बीजं जगभर पसरली आहेत.

पण अलीकडच्या काळामध्ये कोल्हापूरची आणि महाराष्ट्रातील मराठी कलावंतांची परिस्थिती खालावलेली दिसते, त्यांची अवस्था मोडकळीला आल्यासारखी दिसते. सध्याचे कोरोना किंवा इतरही अनेक कारणे यासाठी असू शकतात, पण एक प्रमुख कारण म्हणजे कलाकार वर्गाला असणारा राजाश्रय किंवा दातृ वर्गाचा आश्रय. आणि पहिल्यांदाच कलाकारांवर आपल्या कलेला आणि पर्यायाने स्वतःला प्रतिष्ठा मिळवून देण्याची, आपली गुजराण करण्याची जबाबदारी आलेली आहे. एका अर्थाने ही जमेची बाजू असू शकते, कारण यातून कलाकार स्वावलंबी होणे महत्वाचे आहे. पण या पार्श्वभूमीवर कला क्षेत्राला बऱ्याच बदलांना समोर जावं लागत आहेत. पण दुर्दैवाने या बदलांचा पोत समजणे कलाकारांना कठीण जात आहे. कारण घडणारे सर्वच आंतरिक, सामाजिक बदल आर्थिक दृष्ट्या स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करतात का हे बघणे काळाची गरज झाली आहे. मग यासाठी काय करता येईल असा प्रश्न चिंतेचा आणि चिंतनाचा होता. फक्त चिंतनाचाच नाही तर सन्मानाने स्वतःच्या बळावर स्वतः पोट भरण्याचा आणि जगण्याचा सुद्धा.

आपल्या मातीचे सुपुत्र डॉ ज्ञानेश्वर मुळे आणि यांच्या सोबतच काही विशेषज्ञ लोकांशी चर्चा करून भवानी सामाजिक संस्थेने ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या चांगुलपणाच्या चळवळी बरोबर एक उपक्रम राबिवण्याचे ठरवले आहे.

Link to our crowdfunding campaign : https://milaap.org/fundraisers/support-artist-with-their-livelihood

याच्या पहिल्या टप्यात, कोल्हापूर, महाराष्ट्र आणि देशातील कला क्षेत्रात पूर्ण वेळ काम करत असलेल्या कलाकारांना एकत्र घेऊन एक नेटवर्क तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. कलाकार श्रोत्यांशिवाय अपूर्ण असतो म्हणून त्यांची कला आणि प्रतिभा प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचं काम, विविध ऑनलाईन आणि हळुहळू ऑफलाईन प्रदर्शने आणि इतर बरेच उपक्रम, baramati.org या website द्वारे ही संस्था करणार आहे. त्याच बरोबर कलाकारांसाठी उपलब्ध असलेल्या स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील, सरकारी तसेच बिगर सरकारी योजना, शिष्यवृत्त्या, फेलोशिप आपल्या मराठी कलाकारांपर्यंत पोहोचवणे; त्यासाठी त्यांना अर्ज करण्यासाठी मदत करण्याचे काम या संस्थेमार्फत आणि मुळे सरांच्या मार्गदर्शनाखाली चालू झालेल्या गिविंग बॅक मिशन तर्फे करणार आहोत. भरपूर सरकारी योजना आणि शिष्यवृत्त्या कलाकारांसाठी उपलब्ध असतात पण त्याचा लाभ घेतला जात नाही, कारण या योजना सामान्य माणसापर्यंत बऱ्याच कारणांमुळे पोहोचत नाहीत असे लक्षात आले. आणि म्हणूनच भवानी सामाजिक संस्था(Baramati.org) आणि गिविंग बॅक मिशन या कामासाठी पुढे येत आहे.

याच बरोबर, baramati.org एक सामाजिक उपक्रम म्हणून उभी राहत आहे. Crowdfunding द्वारे एक फंड गोळा करून त्या देणगी मिळालेल्या रकमेमधून प्रतिभावंत कलाकारांच्या कलाकृतीचा संग्रह करण्यास सुरुवात झाली आहे. यातून कलाकारांना आणि त्यांच्या कलेला योग्य आर्थिक मोबदला मिळावा आणि त्यांची कला सन्मानाने रसिकांपर्यंत जाऊ शकते. या कलाकृती बघण्यासाठी आणि त्याच्यावर चर्चा करण्यासाठी एक आर्ट स्पेस आणि खुले व्यासपीठ सगळ्या लोकांसाठी समर्पित करत आहोत. दीर्घावधी मध्ये या संग्रहासाठी पन्हाळा येथे आपली खाजगी जागा सुद्धा या उपक्रमासाठी सौ. सुमन साळोखे अध्यक्षा – भवानी सामाजिक संस्था) यांनी उपलब्ध करून द्यायचे ठरवले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतात एकाही नवीन संग्रहालयाची बांधणी झालेली नाही. पन्हाळ्याला रिसॉर्ट किंवा हॉटेल बांधण्या बरोबरच असे काहीतरी उभारले तर, कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या कलाकारांना व्यक्त होण्यासाठी एक हक्काची जागा तर मिळेलच पण प्रेक्षकांना पण रसग्रहण करून आपल्या जीवनाच्या इतर पैलूंमध्ये सौंदर्यदृष्टी आणण्यास प्रेरणा सुद्धा मिळेल. हे या उपक्रमाचे उद्धिष्ट आहे. हे ठिकाण आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, त्याच बरोबर स्थानिक आणि भारतीय कलाकारांना आंतरराष्ट्रीय कलाकांबरोबर या क्षेत्रात सक्रिय आणि सकारात्मक सभाग घेता यावा, यासाठी पण हे संग्रहालय समुदाय केंद्राचे म्हणजेच community hub चे काम करेल.

यासाठी शेवटी एक खूप महत्वाचे आणि कळकळीचे आवाहन मी वाचकांना करू इच्छितो. आधी म्हटल्या प्रमाणे कलाकार हा त्याच्या प्रेक्षकांशिवाय अपुरा असतो. आज कलेला लोकाश्रयाची गरज आहे. म्हणूनच आम्ही सध्या चालू केलेल्या funding campaign ला सढळ हाताने आर्थिक देणगी देऊन आपल्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरला, कलापूर म्हणून परत नावलौकिक मिळवण्यासाठी सहभागी व्हा! आपल्या वाचकांमधील 1 लाख लोकांनी १०० रुपये इतकी जरी देणगी दिली तरी हा उपक्रम मोठ्या पातळीवर नेण्यासाठी आपली मदत प्रचंड मोलाची ठरेल.

Baramati.org एक सेवाभावी संस्था आहे, आणि याचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.

हे campaign milaap.org वर verified म्हणजेच अधिकृत आहे. खाली दिलेल्या upi id वर google pay paytm किंवा फोन पे द्वारे तुम्ही ऐच्छिक रकम पाठवू शकता.

Upi id :

किंवा खाली दिलेल्या खात्यावर पण तुम्ही देणगी जमा करू शकता.

Virtual account name: artist with their livelihood – Milaap
Account number: 2223330083979761
IFSC code: RATN0VAAPIS
Bank name: RBL

या उपक्रमा शी संबंधित सर्व माहिती आम्ही Baramati. org या संकेतस्थळा वर उपलब्ध करून देत आहोत.
अधिक माहितीसाठी आणि कलाकारांना या network चा भाग व्हायचे असेल तर पुढील क्रमांकावर नक्की संपर्क साधावा: 9764148789

दायगो,
17 september 2020
कोल्हापूर

हे घरचि माझे विश्व

Photo by NASA 

खूप दिवस विचार करतेय लिहावं. Microbiology आणि research background असल्याने आणि सतत वाचतेय त्यामुळे अस वाटत की लिहावं पणं दुसरीकडे काही गोष्टी मला रोखत आहेत. पण आज मात्र मी मला जे सांगावे वाटते आहे जे की जनहिताचे आहे ते. लेख लिहिताना पाऊस पडतोय गेले दोन तास. आता या वेळेला पाऊस नसता आला तर खर बर पणं आपल्या हातात नाही ते म्हणून जे आपल्या हातात आहे ते आपण प्रामाणिक पणें करायचं.

माहिती चा प्रसार


असं सतत समोर येतंय की ज्याने लोक घाबरून जातील असे मेसेज देऊ नयेत कारण ते कमकुवत असू शकतात. किंवा त्याने negativity येते. बरोबर आहे पणं थोड आश्चर्य ही वाटत, कारण सध्या आपण न भूतो  न भविष्यती अशा परिस्थितीत आहोत. त्यात पुन्हा कधीही आपल्या वर अशी स्थिती येऊ नये ही प्रार्थना. अशा वेळी तेंव्हा आपण जेवढी माहिती मिळेल तेवढी मिळवायला हवी का नको? 

तर तुमच्या माझ्या वाटण्यावर जगात काय व्हावं अस घडत तर आपल्या सारखे भाग्यवान आपणच. पण तसे नाहीये. संकटात कोण टिकत? तर धीर धरून राहणाराच टिकतो. डार्विन ची जी खंबीर तो टिकला ही थिअरी माहित नाही का आपल्याला? पण सतत हे कानावर येत असल्याने मी थोडी थांबून होते पणं आज मला वाटत मी लिहावं. मी थोडा माझ्या बाजूने प्रयत्न करणार आहे, अजूनही अजूनही जर आपण काही करू शकलो आणि  स्टेज 3 थोडी थोपवू शकलो तर. मी खर तर त्यावरच फोकस ठेवला आहे.

हा व्हायरस धोकादायक का आहे?

आत्तापर्यंत आपण वाचलं असेलच की तो फार जास्त वेगाने एकाकडून दुसऱ्याकडे संक्रमित होतो. म्हणून खर तर तो H1N1 पेक्षा कमी विषारी असला तरी जास्त नुकसान करतो.. अस सांगितल जातंय साधारण 2 टक्के लोक फक्त मृत्युमुखी पडताहेत. मी फक्त म्हणतेय कारण आजमितीला बाकीचे रोग यापेक्षा जास्त मृत्यू घडवून आणतात. भारतातील च उदाहरण घेऊ. भारतात आजही दर वर्षी लोक निव्वळ सध्या फ्लूने  लोक मरतात, TB या रोगाने साधारण 2, 20,000 लोक मृत्युमुखी पडतात दर वर्षी असे आकडे सांगतात. मग आपण असे हवालदिलं होतो का? तर नाही. कारण अनेक आहेत त्यातले एक म्हणजे जरी टीबी एककडून दुसऱ्याकडे संक्रमित होतो तरी तो या प्रमाणत होते नाही. आपण जर सध्या जी स्वच्छता बाळगतो तशी जर आपण कायम ठेवली, तर टी बी आपल्या देशातून हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही. शिवाय टी बी हा सुद्धा खूप केसेस मध्ये बरा होतो. त्यावर उपाय योजना आहेत. फ्लू म्हणल तर तो सुद्धा आपल्या आपण बरा होतो. अस म्हणतात फ्लू आल्यावर तुम्ही डॉक्टर कडे गेलात तर 7 दिवसात बर व्हाल नाही गेलात ते आठवड्यात. थोडक्यात फ्लू हा सेल्फ लीमितींग रोग आहे. अस सांगितल जातंय की जपान मध्ये कोविद19 कमी का आहे कारण एरवीच जपानी लोक खूप स्वच्छता बाळगतात, मास्क बांधतात, शिवाय सतत हात धुतात. तुम्हाला तो द्रष्टा माहित आहे का की ज्याने सर्वप्रथम जगात हात धुण्याच महत्व मेडीसिन मध्ये किती आहे हे समजावून सांगितले. इग्नास सेमेलेविसे त्याच नाव, साल साधारण 1842. पणं त्याला वेडा ठरवला गेला. डॉक्टर्स लोकांनी च त्याच्या थिअरी ल विरोध केला. त्याला वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये टाकला आणि शेवटी  तिथेच त्याचा मृत्यू झाला. आज तुम्ही आम्ही आणि मोठे मोठे लोक हात कसे धुवायचे याच प्रशिक्षण घेतोय. असो तर थोडक्यात मुद्दा असा की आजच्या आजारात आपल्याला कशाशी लढायच? तर या व्हायरस च्या इथून तिथे उड्या मारणाच्या स्वभावाशी म्हणून म्हणून घरात रहा, संपर्क टाळा. यात न कळण्या सारखे काही नाही. फक्त प्रामाणिक पणे पाळा. मग मी आत्ता चक्करच मारतो. आम्ही खाली जाऊन गप्पा मारतो हे टाळा. बोला एकमेकांशी पणं फोन वर बोला, झूम वर बोला, आहे ना technology तुमच्या दिमतीला. हे जे छाती दडपवणारे पेशंट चे आकडे येताहेत अमेरिकेतून, यूरोप मधून त्यातून आपण धडा शिकायला नको का? साधा हिशोब आहे जितके कमी लोक संपर्कात येतील पेशंट सोबत तितका कमी पसरेल तो रोग.. आणि आत्ता कोणीही असू शकतो याचा कॅरियर.. यालाच म्हणताहेत रोगाचा चढता आलेख फ्लॅट करायचा, चढता आलेख आडवा करायचा, नंबर कमी करत जायचा.. म्हणून दोस्तांनो घरी रहा, भाजी नाही मिळाली, अगदी चहा नाही मिळाला तरी चालेल पण कृपया आपल्या सरकार ला मदत करा. पोलिसांना पणं किती ताण आहेत. त्यांना हे काम मागे लावू नका जे तुम्हाला सहज करणे शक्य आहे. जगाला मदत करत स्वतःला मदत करायची ही खूप नामी संधी आहे.

कोरोना मुळे मृत्यू आणि घेण्याची काळजी.

 मग तुम्ही म्हणाल पणं मृत्यू किती होताहेत. पुन्हा एकदा सांगते  त्या मानाने मृत्यू कमी आहेत, कशाच्या तर जितक्या लोकांना रोग झालाय त्यांच्या मानाने. ही थोडी आकडेवारी क्लिष्ट होईल पणं इलाज नाही. या निमित्ताने शिकायला मिळाले अस समजू आपण. साधारण 2 टक्के एवढा मृत्यू दर आहे. अस प्राथमिक रित्या दिसत आहे की हे मृत्यू बहुतांशी अशा लोकांमध्ये झाले आहेत ज्यांना काही दुसरा आजार ज्याला को मोरबिदिटी म्हणतात, जसं की जास्त वय किंवा डायबिटीस, किंवा अजून काही सिरियस आजार, जसे सिपिओडी, दुसरा कुठला तरी रोगजन्तु, ब्लड प्रेशर अथवा इतर काही. अशी बाकीची पण पुरेशी कारण मृत्यूला कारणीभूत असू शकतात.  तिथेही लागली प्रत्येक जण नाही मृत्युमुखी पडणार. वार्धक्याचा इफेक्ट प्रत्येकात काय आहे हे बघावा लागेल.इटली मध्ये अनेक मृत्यू हे वयस्कर लोकांमध्ये झाले असे सांगितले जाते पणं बाकीचे फॅक्टर जस की त्या माणसाची इम्मुनिटी, वेळेवर मिळालेली मदत, त्याच आत्मभान आणि धैर्य पणं महत्वाचे आहेत सर्वात. आणि महत्वाचं म्हणजे आपण आपल्या आरोग्य व्यवस्थेवर ताण दिला नसेल तर ती जसे की हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, नर्सेस, आपल्याला पूर्ण ताकदीनिशी मदात करू शकतील. म्हणून, म्हणून व्हायरस ला तुमच्या जवळ येण्याचे सर्व मार्ग बंद करा. नुसते मला भीती वाटते म्हणून कधीच आयुष्यात संकट जात नाहीत. ती विचारपूर्वकच लढावी लागतात. जस की मला काही दिवसापूर्वी स्ट्रोंग स्टँड घ्यावा लागला एका मीटिंग संदर्भात, तसच काल काही पालकांना मला सांगाव लागलं, तुम्ही मुलांना खाली आणु नका. तुम्ही जिथे बसलाय तिथे कदाचित तो असेल करोना. सांभाळून आणि घाबरून राहता, तर  नुकसान नाही काही.

कोरोना बारा होऊ शकतो.

आता सर्वात महत्वाची गोष्ट. साधारण 85 टक्के लोकांना या आजारात किरकोळ त्रास होतो. साधारण फ्लू सारखा. हे खूप महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या लोक बरे होताहेत. तेंव्हा घाबरु नका. पणं मुद्दा हा आहे की बरे होणार म्हणून आजारी पडावे का? तर नाही, म्हणून काळजी घ्या. टोकाची काळजी घ्या. देशाचा, जगाचा विचार करा. बघा असा विचार करा, पृथ्वी प्रदूषणाच्या विळख्यातून थोडीशी सुटते आहे. ती भरभरून देईल तुम्हाला जर तुम्ही मोकळा श्वास तिला घेऊ दिला तर. या रोगात घाबरून जायचे काहीच कारण नाही. या पेक्षा जास्त probability रस्त्यावर अपघातात  मृत्यू होण्याची असते.

कोरोना ची लस आणि आरोग्य


तर लोकहो आपण जर शास्त्र जाणून घेतले तर खूप सोप्प आहे समजायला.हो खरं आहे की अजून आपल्याला अनेक गोष्टी माहित नाहीत जसे की हा कुठून आला, पणं एक सांगू उगाच काहीतरी कन्स्पीरसी थिअरी त आत्ता अडकू नका. पुढचा प्रश्न,  याला औषध काय ? जगभर प्रयत्न चालू आहेत, नक्कीच काहीतरी उपाय मिळेल तोवर धीर धरा, लस नाही का? अजून नाही पणं होऊ शकेल. पणं तसाही व्हायरस वर प्रभावी लस नाही बनत कारण व्हायरस सारखा mutate होतो, इथे जास्त खोलात जावे लागेल जे की मी आत्ता टाळणार आहे. पणं लस आणि उपाय बनेल नक्कीच बनेल. आता व्हायरसला प्रतिबंध करणारे काही इतरही घटक शरीर तयार करते. इंटरफेरॉन हे प्रोटीन तसेच आहे. त्याचाही उपयोग नक्कीच होईल रुग्णांना जर त्यांनी तन आणि मन टफ ठेवलं.

कोरोना पासून बचावासाठी त्याची माहिती ठेवा.

विस्ताराने परत सांगायचे तर हिम्मत धरून कॅरोना बद्दल वाचा, जेणे करून तुमचे नुकसान कमी होऊ शकते. सत्य आणि तथ्य जाणून घ्या, पुढंचे काही दिवस घराबाहेर पडू नका. कोणी पडत असेल तर प्रसंगी वाईटपणा घेऊन त्यांना अडवा. सगळे मिळून आपल्या जगाला वाचवू. “हे विश्वची माझे घर” म्हणून मग “हे घरची माझे विश्व” म्हणा येते काही आठवडे. व्यवस्थित खाणे, झोपणे, व्यायाम, प्राणायाम, फोन वर गप्पा, गाणी, सिनेमे, जुने फोटो, पुस्तके, लिखाण, आठवणी, कविता, टीव्ही ज्याने मन रमेल ते करा जेणे करुन तुमची स्वतःची इम्मुनिटी व्यवस्थित काम करेल आणि तुमचे आरोग्य नीट राहील. धीर धरा.

“धीर धरी रे धीरापोटी फळे रसाळ गोमटी”. वेळ आलीच तर धीराने सामोरे जा.

 Stay safe। Stay home।Stay informed.

डॉ मधुरा विप्र, PhD 
[email protected]
9822065743
रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर.विचारमंचा ची सुरुवात – वाचा, विचार मांडा.

Corona – a chance to reform.

कोरोना ने जगभरात सगळीकडे थैमान घातलं आहे. लोकं घरी बसलीएत, रस्ते, बाजारपेठा, कामगार वर्ग आणि एकूणच जीवनमान ठप्प झालंय. भारतासमोर, तरुण वर्गासमोरही खूप सारे अनोळखी आणि नवीन प्रश्न उभे ठाकलेत. या सगळ्या अनिश्चिततेच्या काळामध्ये बहुतेक प्रत्येकच व्यक्ती आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांमुळे काम-धंद्यांपासून ते स्वतःवर होणाऱ्या छोट्या-मोठ्या परिणामापर्यंत या सगळ्या नवीन वास्तवावर जाणीव-पूर्वक किंवा अजाणता सुद्धा विचार करत असेल. 

– मी आत्तापर्यंत जे काही काम करत होतो त्याला खरंच काही अर्थ आहे का?, मला ते आवडत होतं का? कि मी नुसतं डोळे मिटून सगळ्या गोष्टी करत होतो/होते? 

– कोरोना नंतर भारत आणि जग कसं असेल? अर्थव्यवस्थांच्या पटलावर काय लिहिलेलं असेल? 

– ‘कोरोना-नंतर’ असं काही असेल का? कि हा आपल्या जगण्याचा आता भाग असणार च आहे?

– छोटी-मोठी गावं, शहरं ते मोठ-मोठे देश, आत्तापर्यंत सवयीचं असलेलं जागतिकीकरण आणि स्वावलंबन याचा सुवर्णमध्य गाठतील का?

– उत्पादन आणि सर्व प्रकारची साधनसंपत्ती यावर या सगळ्याचा काय परिणामम होईल?

– तगड्या  आणि टिकाऊ गोष्टीची मागणी करणारा भारत, आपली गरज स्वतःच पूर्ण करेल का?

– नैसर्गिक गरजा भागविण्यापासून ते प्रगत-अतिप्रगत संस्कृतींपर्यंत पोहोचलेल्या माणसाच्या मनावर, विचारांवर आणि पर्यायाने संपूर्ण मानव संस्कृतीवर, आयुष्याच्या प्रत्येक अंगावर या सगळ्याचा कसा परिणाम होईल?

– आपलं ‘नवीन नेहमीचं’ आयुष्य कसं असेल? हेच आपलं नवीन वास्तव आहे का?

यासारख्या प्रश्नांची गणती सुद्धा शक्य नाही. एखाद्या काल्पनिक चित्रपटामध्ये शोभावी अशी सगळी दुनिया.. प्रत्येकाला काही ना काही वाटतंय; ते आपण वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या माध्यमांमधून व्यक्त करतोय, त्यावर प्रतिक्रिया देतोय आणि त्याला प्रतिसादही देतोय. भारतासारख्या तरुण देशातला तरुण सुद्धा एका टप्प्यावर येऊन थबकून विचार करतोय कि मी यात कशा प्रकारे सहभागी होऊ शकतो. 

म्हणूनच यासाठी एक Baramati.org नावाचे व्यासपीठ तयार केले आहे. अशी जागा कि जिथे असे सगळे प्रश्न, अशा असंख्य कल्पना लाखो तरुणांना एकमेकांकडून नवी उमेद आणि आशा देऊन जाईल. काहीतरी करूया या तरुणाईच्या ‘करू’ वृत्तीच्या धडपड्या आणि  सळसळणाऱ्या उर्जेला सृजनशीलतेची साथ मिळेल. 

म्हणूनच या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना Baramati.org वर आपले आणि आपल्या मुलांचे विचार शेअर करण्यासाठी मनापासून आमंत्रण देतो. 

आम्हाला तुमचं कोणत्याही प्रकारचं लेखन, चित्र, फोटो, व्हिडिओ WhatsApp केले तरी चालतील. आम्ही ते  संकेतस्थळावर प्रकाशित करू. सध्या website खूप साधी असली तरी, तुमचा early adaptors म्हणून यात सहभाग खूप मोलाचा ठरेल. 

सोबत आपल्याबद्दल संक्षिप्त माहिती जोडायला विसरू नका: नाव, कार्य बद्दल, व contact details (optional)

कृपया हि पोस्ट जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. 

दायगो – + 91 9764148789

प्राची : +91 90490 40091