‘अंधारी’ दरीतली हिरवी सकाळ…

पियुषा प्रमोद जगताप –

लेखिका भारतीय वन सेवेतील (IFS) तुकडी-२०१४ अधिकारी असून सध्या मेळघाट वन्यजीव विभागात कायर्रत आहेत. या पोस्ट मधील छायाचित्रे पियुषा यांनी स्वतः टिपलेली आहेत.

उन्हाळ्याची चाहूल यंदा तशी उशीराच लागत आहे. होळी संपून आठवडा झाला तरी अद्यापही विदर्भातील हवा अजून म्हणावी तशी तापली नाहीये. दर वर्षी प्रमाणे मार्च महिन्याची धामधूम, त्यात अजून हे corona चं लोण सगळीकडे पसरत चाललेलं. शेवटी मनाची हय्या करून, बाहरे पडायचंच असा पक्का निश्चय करून आज सकाळीच निघालो, जवळच, घाटांग रस्त्याला. सकाळी सहाची वेळ. तांबडं फुटलं तरी सूर्योदय अद्याप व्हायचाच होता. हवेत मस्त गारवा होता. लेकीची गुलाबी झोप मोडू नये म्हणून तिची पाळण्यात रवानगी करून आम्ही निघालो. पाळण्याची दोरी अर्थात तिच्या आज्जीच्या हाती देऊनच!

कुसुमाच्या झाडाची नवी पालवी…

घटांग पासून पुढे थंडी जरा जास्तच जाणवायला लागली. त्यातच आम्ही नियोिजत ठिकाणी पोचलो. हे ठिकाण धारणी-परतवाडा मुख्य रस्त्यालगतच्या एका वळणावर होतं. गुगीर् पूल त्याचं नाव. अनेकदा या रस्त्याने जाताना ठरवलं होतं या दरीत कधीतरी उतरायचंच.

आज तो योग जुळून आला. सपना नदी खोर्‍यातली ही दरी. एका बाजूला प्रिसध्द गिरीस्थान चिखलदरा तर दुसर्‍या बाजूला तितकीच उंच माखल्याचे पहाड. आणि मध्ये सिपनेच्या विस्तीर्ण खोर्‍यातली, दुतर्फा जंगलाने वेढलेली ही एक दरी! पानगळीच्या सागाच्या जंगलाला अपवाद अशीही जागा. सदाहरित. दरीच्या माथ्यावर एकीकडून वळणा वळणाचा मुख्य रस्ता तर दुसरीकडून एक नैसर्गिक रोपवन. याच ठिकाणी तीन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर बांबूच्या झाडांना फुलोरा आला होता. त्यानंतर बीज तयार झाल्यावर बहुतांशी बांबू बेटं सुकून गेली होती. दरीत उतरतांना समोर अस्वल आलं तर काय हा नेहमीचा प्रश्न मनात ठेवून सुरवात केली. शासकीय दौरा असल्याने आठ जणांचा चमू सोबत होताच.

हिरडा-झडी (जिथे हिरड्याचं झाड उभं आहे तिथून ) आम्ही उतरायला सुरुवात केली. उतार विशेष नव्हता, साधारण शंभर मीटर चालत गेल्यावर आम्ही अंधारी नाल्याच्या प्रवाहात जाऊन पोचलो. हा या दरीचा मुख्य नाला. उन्हाळा असूनही अद्यापही पाणी वाहत होतं. आम्ही पाणी चुकवत गोट्यांवरून उड्या मारत मारत चाललो. ऊन आलं असलं तरी खाली पोचत नव्हतं . पण दरीत येणारं एक प्रकारचं दडपण इथे येत नव्हतं. कुं द हवा वा हत होतीच . नाल्याभोवती मोठी आंब्याची झाडं डौलात उभी होती. कमीत कमी 20 ते 22 मीटर उंचीची ती झाडं अवघं आकाश व्यापून टाकत होती. सहज म्हणून एका झाडाची गोलाई मोजली तर ती किमान अडीच मीटर भरली. अजून एकाची मोजली तर तब्बल साडेचार मीटर घेर असलेला तो भव्य आम्रवृक्ष होता. आंब्याच्या खाली भरपूर प्रमाणात आंब्याची रोपटी उतरलेली होती. सशक्त जंगलाचं एक महत्वाचं लक्षण! आंब्याची झाडं सदाहिरत असल्याने हिरव्यागार पानांनी डावरलेली होती. काही फांद्यांना नवी पालवी फुटलेली होती. रानडुकराने खाऊन टाकलेल्या मागच्या वर्षीच्या कोयींचें अवशेष अजून दिसत होते. त्यावरून एकूण फळ लहान असावं आणि खूप प्रमाणात येत असावं हे जाणवत होतं. मेळघाटात इतक्या मोठ्या प्रमाणावर इतकीमोठी आंब्याची झाडं मी पहिल्यांदाच पाहत होते. प्रत्येक झाडाला एक व्यक्तिमत्व असतं असं माझं ठाम मत असल्याने, अश्या व्यक्तिमत्त्वांना जवळून पाहण्याचा, त्यांचा सहवास अनुभवण्याचा आनंद काही औरच असतो. त्यात आंबा हा पुरातन काळापासून मांगल्य, सुफळसंपूणर्तेचं प्रतीकआहे. परंतु यंदा आंबा म्हणावा तसा फुलाला नव्हता.तरीही त्याची पालवी प्रसन्न करणारीच होती.

अंधारीनाल्याच्या दुतर्फा आंबा आणि जांभळाचे दाट गर्द दिसत होती. दरीत बर्‍यापैकी खाली उतरल्यावर एका ठिकाणी पाण्याचा आवाज कानावर पडला. थोडीशी वाट वाकडी करून एका धबधब्याजवळ पोचलो. गुिगर् पुला खालून वाहणार्‍या नाल्याच्या हा तयार झालेला धबधबा.

गुर्गि धबडबा

धबधब्याच्या परिसरात मोठे वाढलेले गवत दिसत होते. ते बहुदा हत्ती गवत असावे. त्याला छान फुलोरा आला होता. वाटेवर उगवलेले नेचे (फर्न) अजून हिरवेगार होते. नाल्याची आता ‘अंधारी नदी’ झाली होती. इतक्या वेळ केवळ पाटा (खडक) असल्याने न दिसणारे प्राण्यांचे ठसे आता मधून मधून वाळूच्या पट्ट्यात उमटलेले दिसत होते

 गवे, सांबर, भेडकी, अशा तृणभक्षी प्राण्यांच्या खुरांची तुलना करत त्यांचे फोटो घेत आम्ही पाटा नाल्याजवळ आलो. अंधारी नदीला मिळणारा हा नाला सरळ दरीत उडी घेत होता. त्याला वाहतं पाणी नसलं तरी पावसाळ्यात मोठा धबधबा होत असणार इथे. त्याच्या पायथ्याला डोहात मात्र अजून पाणी साठून होते. नदी पात्र आता थोडं रुंदावलं होतं. आंबा व जांभूळ यांच्या सोबत अर्जुनही दाटीवाटीने उभे होते. काही ठिकाणी वडाच्या पारब्या नदीवर ओणावल्या होत्या. खाली थंड, स्वच्छ, नितळ पाणी वाहत होतं.

पारब्या बांधून झोका बनवावा असं एकदा मनात आलं पण माझ्या! चित्रपटातील नायिकेने त्यावर बसून झोका घेतल्यास तिच्या पायाने पाण्यावर अजूनही तरंग उमटावेत असं हे ठिकाण. पण निसर्गाची रचना बदलून पाण्याकडे धावत निघालेल्या त्या कोवळ्या मुळांना बांधून ठेवण्याचा विचार मी ताबडतोब झटकून टाकला. जंगल भ्रमण केल्यावर काही काळा नंतर तुम्हाला गोष्टी फक्त पाहत राहव्याशा वाटतात.

अर्जुन

त्यात बदल करावा, निसगार्च्या नियमात हस्तक्षेप करावा असं नाही वाटत. लहानाहून लहान गोष्टीमागे काहीतरी करण असतं. निसर्गातील प्रत्येक गोष्ट हा छोटासा चमत्कारच असतो आणि तो दुरून पाहणे व समजून घेणे यातच खरा आनंद असतो.

साधारण तीन किलोमीटर चालल्यानंतर धामणीकुंडीनाला आडवा आला. त्यात सलग पाणी वाहत होते. खडकात डोह तयार झालेले होते आणि खाली-वर असणार्‍या दोन डोहांना पाण्याचे ओहोळ जोडत होते. पाणी घसरगुंडी खेळत असावे असा हा भाग होता. सलग, शांत, नितळ. पूर्वी फुलोरा येऊन गेलेल्या बांबूच्या सुकलेल्या रांझी पांढर्‍याशुभ्र दिसत होत्या. त्यांच्या भोवती बांबूची असंख्य पिल्ले पसरलेली होती. त्यातली सशक्त रोपांचे कालांतराने नवीन रांझीत रूपांतर होईल.

सुकलेल्या बांबूचे एक खोड मातीतून बाहरे आलेले होते. पावसाने स्वच्छ धुऊन निघाल्याने नैसर्गिक काष्ठिशल्पच वाटत होतं ते. त्यावर वाढणार्‍या लाखेच्या किड्यासाठी प्रसिद्ध असणारी कुसुम ची झाडं नव्या पालवीने नटली होती. लाल-लाल पानं वार्‍यावर डोलत होती. दरीत वाहतं पाणी, हवा आणि पाखरांचा नादमधुर स्वर गुंजत होता. वातावरण भारावल्यासारखे झाले होते.


इतक्यात वरून दोन मोठी घुबडं आमच्या चाहुलीने उडत उंच अर्जुनावर जाऊन बसली. फीश आऊल प्रजातीची ती होती. थोडंस पुढे गेल्यावर कोतवाल (रॅकेट टेल्ड ड्रॉणगो) आणि ट्री-पाय यांची पकडा-पकडी सुरू होती. पोपटांचे थवे इकडून तिकडे उडत होते. एक छानसं पोपटाचं पीस मला सापडलं. बहुदा शेपटीचं ते असावं असा माझा अंदाज. हिरवा निळा तपकिरी असा चमकदार रंग असलेलं ते पीस मी हलके च एका ब्रॅकेट मश्रूम मध्ये खोवलं. हे मश्रूम लाकडी कडक प्रकारातले एक.

ब्रॅकेट मश्रुम

पावसाळा नसूनही कुजक्या तुटक्या फांद्यावर वाढणारं.  त्याचा एक छानसा फोटो काढून आम्ही पुढे निघालो.

आम्रा नाला ओलांडून आम्ही पुढे पुढे चालत रािहलो. कधी नदीपात्रातून तर कधी बाजूच्या जंगलातून. आता हळू हळू रायमुनिया अथार्त घाणेरीचे प्रमाण वाढत चालले होते. साधारण पंचवीस तीस मीटरवर झडुपं सळसळ करत होती. आम्ही सावध झालो. कानोसा घेत स्तब्ध उभे रािहलो. तेवढ्यात एक मोठा गवा समोर चालत गेला. त्याच्या मागे दोन अजून पिल्लं त्याच वाटेवरून गेले. गव्यांचा कळप बहुदा आसपास चरत असावा. आम्ही तडक तिथून पावलं उचलली. अस्वलाची विष्ठा ठिकठिकाणी सापडत होती. नुकत्याच संपत आलेल्या रायमुनियाच्या छोट्या छोट्या काळ्या गोड फळांचा त्याने फडशा पाडलेला स्पष्ट दिसत होता.


मोठ्या झाडांची अजब सरिमसळ इथे पाहायला मिळत होती. अर्जुन बहुतांश ठिकाणी यजमान (होस्ट) चे काम करत होता. त्याच्या पांढर्‍या तुकतुकीत खोडामध्ये वड, आंबा, जांभूळ, अगदी रायमुनीय सुद्धा वाढलेला दिसत होता. एका ठिकाणी तर आंबा आणि अर्जुनाची झाडं एकमेकांना बिलगून एक होऊन गेली होती. साधारण अडीच मीटर गोलाईचं एक आंब्याचं आणि एक अर्जुनाचे झाड, त्यांच्या फांद्या आडवी कलमं केल्यासारख्या एकमेकांना जोडल्या गेलेल्या, किमान चार ठिकाणी. शिवाय जोडच्या ठिकाणी घेर साधारण पाऊण ते एक मीटर! सयामी जुळी (काँजॉइन्ट ट्विन्स) असावीत अशी ती झाडं! एक काळं एक पांढरं! लहान मूल जसं नवीन गोष्टी पाहून हरखून जातं तसं काहीसं माझं मनातल्या मनात झालं होतं.

आंबा आणि अर्जुन

पुढे चक्र गोटा नावाचा नाला येऊन अंधारीला भिडला. हे सर्व नाले डाव्या बाजूनेच नदीला मिळत होते. आता नदीपात्र कोरडं झालं होतं, पण जमिनी खालून, लहान-मोठया गोट्यातून, छुपा प्रवाह वाहत होताच. मधूनच पाणी दिसे मधूनच पूर्ण गायब होऊन जाई. चिकरगोट्याच्या डोहात दीड पुरुषभर पाणी होतं. त्यात पुलासारख्या दोन कपारीत अडकलेल्या शिळेवर उतरून आम्ही बांबूच्या साह्याने त्याची खोली मोजली. त्यातही संततधार वाहतं पाणी होतं. समोर दोन मोठे मधुबाज (हनी बझडर्) आपले पंख पसरवत उडत गेले. उंच सागाच्या झाडावर जाऊन बसले.

चीकर गोठा


पाणी पाहून आम्ही देखील थोडी विश्रांती घेतली. नेमकाच माझ्या बुटाचा चिटकावलेला तळ निघून आला होता. तब्बल पाच वर्ष  त्याने अविरत सेवा दिल्यानंतर आता त्याची मरम्मत करायची वेळ आली होती. सात किलोमीटर अंतरा नंतर बूट-मोजे काढून पायाला पाण्याचा स्पशर् स्वगर्वत वाटत होता. नदीचा तळ स्पष्ट दिसत होता. लहान लहान मासे आणि पाण-निवळ्यांचे थवे इकडून तिकडे पोहत होते. निवळयां सोबत पाण्यावर तरगंणारे कोळ्या सारखे कीटकही होतेच. भक्षकांची दिशाभूल करण्याची त्यांची कला काही औरच असते. हे किटक केवळ पायाची टोके पाण्यावर टेकवतात, पाण्याचे सरफेस टेन्शन वापरून त्यावर चक्क चालतात. त्यांची सावली मात्र पाण्याच्या तळाशी मोठ्ठी पडते. प्रत्येक पायाभोवती एक वलयांतीक वर्तुळ असा एखादा ड्रोन कॅमेरा पाण्यात फिरावा तशी ही सावली दिसते. प्रत्यक्षात तो कीटक मात्र त्यापासून थोडा दूर जवळपास पाण्यात नसल्या सारखाच वाटतो. पाहणार्‍याचं लक्ष सगळं त्या सवलीकडे जातं. सोबत आणलेल्या चिवड्याचा नाष्टा करून पोटभर स्वच्छ पाणी पिऊन कुठलाही कचरा मागे राहणार नाही याची काळजी घेत आम्ही पुढे निघालो. पुढचा अर्धा अधिक किलोमीटर प्रवास बिगर बुटाचा करावा लागला.

सुखलेल्या बांबू चे खोड.

पूर्वी अनवाणी चालायची असलेली सवय आता पार मोडल्याची जाणीव झाली. त्या दरीतून आता आम्ही बाहरे पडत होतो. अंधारी नदी सिपनेच्या पत्रात जाऊन मिळत होती. हा भाग बराचसा चराई झालेला, माणसांचा वावर असलेला जाणवत होता. उन्ह डोक्यावर आलं होतं. त्या सुंदर दरीतले ते सूक्ष्मवातावरण (मायक्रो क्लाइमेट) आता संपलं होतं. आम्ही मुख्य रस्त्याला पोचलो होतो. भर उन्हाळ्यात साडेसात किलोमीटर आणि काही तासांचा हा सुंदर हिरवागार अनुभव सोबत घेऊन आम्ही परतलो.

अंधारी pdf

All photos and text ©Piyusha Jagtap