शांतता

कलाकाराने चित्र बद्दलचे मांडलेले विचार
मला तळ्याच्या काठी बसल्यानंतर खूप शांत आणि छान भासत होतं. मला आठवतंय मी पेंटिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होतो ‘इंटर’ ला. तेव्हा पासून मला पाणी आणि त्याच्यावर तरंगणारी कमळाची पाने आणि कमळ खूप भावायचे. आणि त्याच्या रंगामध्ये हालचाली मध्ये मी रमून जायचो. पाणी शांत आहे, अन त्याच्यावर हळुवार वाऱ्याच्या झोक्यामुळे मस्त हळुवार हालचाल करणारी ही कमळे, आणि त्याची पाने इतकी सुंदर वाटायची; वाह! तेव्हाच मी त्याच्यावर कविताही केल्या अन पेंटिंग सुरु केलं पण ते अपूर्णच राहिलं.
काही वर्ष गेली, आणि गेल्या वर्षी मी बुद्धाच्या मूर्तीकडे पाहिलं की मला तीच शांतता आठवायची. मग असा विचार आला की, आपण या शांततेचं प्रतीक, एक आठवण म्हणून दोघांना एकत्र घेऊ. पेंटिंग मध्ये दोन्हीही शांततेची प्रतीकं ‘पाणी’ आणि ‘कमळ’ असा एक छान निसर्गाच्या सानिध्यात गौतमबुद्ध आपली ध्यानसाधना करत आहेत असा विषय सुचला अन हे छानसं, एक अविस्मरणीय चित्र तयार झालं. आकाशाच्या सावलीत अन प्रतिबिंबामध्ये कमळाच्या विळख्यात शांत पाण्यात, शांत प्रतिमा खूप छान वाटलं अन पेंटिंग कडे पाहिल्यानंतर शांतता भासली.
अन तुम्हालाही शांतता मिळेल या चित्राकडे पाहिले की याचा मला विश्वास आहे.
प्रकाश मोहित – कोल्हापूर
८१४२८४६३५५