कलाकारांना व्यक्त होण्यासाठी हक्काची जागा – Baramati.org

कोल्हापूरला कलापूर म्हणून जागतिक नकाशावर घेऊन जायचे छत्रपती शाहू महाराजांचे स्वप्न भवानी सामाजिक संस्थे ला पूर्ण करायचे आहे. मराठी मातीची जाण आणि ओळख रोमारोमांत भिनलेले कोल्हापूर कायमच कला, साहित्य, चित्रपट या क्षेत्रांमध्ये अग्रेसर राहिलेले आहे. भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथय्या असो किंवा जगाला वास्तववादी चित्रपटांची ओळख करून देणाऱ्या तांबडी माती सारख्या कलाकृती या कोल्हापूरच्या माती ने जगाला दिलेल्या आहेत. आणि या कलाकृतींचा गाभा आहेत ते म्हणजे करवीरनगरीचे अनेक प्रतिभावंत कलाकार. महाराष्ट्राला अशा अनेक कलावंतांचा वारसा लाभलेला आहे ज्यातून अनेक कल्पना रुजून त्याची सृजनशील बीजं जगभर पसरली आहेत.

पण अलीकडच्या काळामध्ये कोल्हापूरची आणि महाराष्ट्रातील मराठी कलावंतांची परिस्थिती खालावलेली दिसते, त्यांची अवस्था मोडकळीला आल्यासारखी दिसते. सध्याचे कोरोना किंवा इतरही अनेक कारणे यासाठी असू शकतात, पण एक प्रमुख कारण म्हणजे कलाकार वर्गाला असणारा राजाश्रय किंवा दातृ वर्गाचा आश्रय. आणि पहिल्यांदाच कलाकारांवर आपल्या कलेला आणि पर्यायाने स्वतःला प्रतिष्ठा मिळवून देण्याची, आपली गुजराण करण्याची जबाबदारी आलेली आहे. एका अर्थाने ही जमेची बाजू असू शकते, कारण यातून कलाकार स्वावलंबी होणे महत्वाचे आहे. पण या पार्श्वभूमीवर कला क्षेत्राला बऱ्याच बदलांना समोर जावं लागत आहेत. पण दुर्दैवाने या बदलांचा पोत समजणे कलाकारांना कठीण जात आहे. कारण घडणारे सर्वच आंतरिक, सामाजिक बदल आर्थिक दृष्ट्या स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करतात का हे बघणे काळाची गरज झाली आहे. मग यासाठी काय करता येईल असा प्रश्न चिंतेचा आणि चिंतनाचा होता. फक्त चिंतनाचाच नाही तर सन्मानाने स्वतःच्या बळावर स्वतः पोट भरण्याचा आणि जगण्याचा सुद्धा.

आपल्या मातीचे सुपुत्र डॉ ज्ञानेश्वर मुळे आणि यांच्या सोबतच काही विशेषज्ञ लोकांशी चर्चा करून भवानी सामाजिक संस्थेने ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या चांगुलपणाच्या चळवळी बरोबर एक उपक्रम राबिवण्याचे ठरवले आहे.

Link to our crowdfunding campaign : https://milaap.org/fundraisers/support-artist-with-their-livelihood

याच्या पहिल्या टप्यात, कोल्हापूर, महाराष्ट्र आणि देशातील कला क्षेत्रात पूर्ण वेळ काम करत असलेल्या कलाकारांना एकत्र घेऊन एक नेटवर्क तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. कलाकार श्रोत्यांशिवाय अपूर्ण असतो म्हणून त्यांची कला आणि प्रतिभा प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचं काम, विविध ऑनलाईन आणि हळुहळू ऑफलाईन प्रदर्शने आणि इतर बरेच उपक्रम, baramati.org या website द्वारे ही संस्था करणार आहे. त्याच बरोबर कलाकारांसाठी उपलब्ध असलेल्या स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील, सरकारी तसेच बिगर सरकारी योजना, शिष्यवृत्त्या, फेलोशिप आपल्या मराठी कलाकारांपर्यंत पोहोचवणे; त्यासाठी त्यांना अर्ज करण्यासाठी मदत करण्याचे काम या संस्थेमार्फत आणि मुळे सरांच्या मार्गदर्शनाखाली चालू झालेल्या गिविंग बॅक मिशन तर्फे करणार आहोत. भरपूर सरकारी योजना आणि शिष्यवृत्त्या कलाकारांसाठी उपलब्ध असतात पण त्याचा लाभ घेतला जात नाही, कारण या योजना सामान्य माणसापर्यंत बऱ्याच कारणांमुळे पोहोचत नाहीत असे लक्षात आले. आणि म्हणूनच भवानी सामाजिक संस्था(Baramati.org) आणि गिविंग बॅक मिशन या कामासाठी पुढे येत आहे.

याच बरोबर, baramati.org एक सामाजिक उपक्रम म्हणून उभी राहत आहे. Crowdfunding द्वारे एक फंड गोळा करून त्या देणगी मिळालेल्या रकमेमधून प्रतिभावंत कलाकारांच्या कलाकृतीचा संग्रह करण्यास सुरुवात झाली आहे. यातून कलाकारांना आणि त्यांच्या कलेला योग्य आर्थिक मोबदला मिळावा आणि त्यांची कला सन्मानाने रसिकांपर्यंत जाऊ शकते. या कलाकृती बघण्यासाठी आणि त्याच्यावर चर्चा करण्यासाठी एक आर्ट स्पेस आणि खुले व्यासपीठ सगळ्या लोकांसाठी समर्पित करत आहोत. दीर्घावधी मध्ये या संग्रहासाठी पन्हाळा येथे आपली खाजगी जागा सुद्धा या उपक्रमासाठी सौ. सुमन साळोखे अध्यक्षा – भवानी सामाजिक संस्था) यांनी उपलब्ध करून द्यायचे ठरवले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतात एकाही नवीन संग्रहालयाची बांधणी झालेली नाही. पन्हाळ्याला रिसॉर्ट किंवा हॉटेल बांधण्या बरोबरच असे काहीतरी उभारले तर, कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या कलाकारांना व्यक्त होण्यासाठी एक हक्काची जागा तर मिळेलच पण प्रेक्षकांना पण रसग्रहण करून आपल्या जीवनाच्या इतर पैलूंमध्ये सौंदर्यदृष्टी आणण्यास प्रेरणा सुद्धा मिळेल. हे या उपक्रमाचे उद्धिष्ट आहे. हे ठिकाण आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, त्याच बरोबर स्थानिक आणि भारतीय कलाकारांना आंतरराष्ट्रीय कलाकांबरोबर या क्षेत्रात सक्रिय आणि सकारात्मक सभाग घेता यावा, यासाठी पण हे संग्रहालय समुदाय केंद्राचे म्हणजेच community hub चे काम करेल.

यासाठी शेवटी एक खूप महत्वाचे आणि कळकळीचे आवाहन मी वाचकांना करू इच्छितो. आधी म्हटल्या प्रमाणे कलाकार हा त्याच्या प्रेक्षकांशिवाय अपुरा असतो. आज कलेला लोकाश्रयाची गरज आहे. म्हणूनच आम्ही सध्या चालू केलेल्या funding campaign ला सढळ हाताने आर्थिक देणगी देऊन आपल्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरला, कलापूर म्हणून परत नावलौकिक मिळवण्यासाठी सहभागी व्हा! आपल्या वाचकांमधील 1 लाख लोकांनी १०० रुपये इतकी जरी देणगी दिली तरी हा उपक्रम मोठ्या पातळीवर नेण्यासाठी आपली मदत प्रचंड मोलाची ठरेल.

Baramati.org एक सेवाभावी संस्था आहे, आणि याचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.

हे campaign milaap.org वर verified म्हणजेच अधिकृत आहे. खाली दिलेल्या upi id वर google pay paytm किंवा फोन पे द्वारे तुम्ही ऐच्छिक रकम पाठवू शकता.

Upi id :

किंवा खाली दिलेल्या खात्यावर पण तुम्ही देणगी जमा करू शकता.

Virtual account name: artist with their livelihood – Milaap
Account number: 2223330083979761
IFSC code: RATN0VAAPIS
Bank name: RBL

या उपक्रमा शी संबंधित सर्व माहिती आम्ही Baramati. org या संकेतस्थळा वर उपलब्ध करून देत आहोत.
अधिक माहितीसाठी आणि कलाकारांना या network चा भाग व्हायचे असेल तर पुढील क्रमांकावर नक्की संपर्क साधावा: 9764148789

दायगो,
17 september 2020
कोल्हापूर

शांतता

पारितोषिक विजेते चित्र – शांतता. कलाकार – प्रकाश मोहिते.

कलाकाराने चित्र बद्दलचे मांडलेले विचार

मला तळ्याच्या काठी बसल्यानंतर खूप शांत आणि छान भासत होतं. मला आठवतंय मी पेंटिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होतो ‘इंटर’ ला. तेव्हा पासून मला पाणी आणि त्याच्यावर तरंगणारी कमळाची पाने आणि कमळ खूप भावायचे. आणि त्याच्या रंगामध्ये हालचाली मध्ये मी रमून जायचो. पाणी शांत आहे, अन त्याच्यावर हळुवार वाऱ्याच्या झोक्यामुळे मस्त हळुवार हालचाल करणारी ही कमळे, आणि त्याची पाने इतकी सुंदर वाटायची; वाह! तेव्हाच मी त्याच्यावर कविताही केल्या अन पेंटिंग सुरु केलं पण ते अपूर्णच राहिलं.

काही वर्ष गेली, आणि गेल्या वर्षी मी बुद्धाच्या मूर्तीकडे पाहिलं की मला तीच शांतता आठवायची. मग असा विचार आला की, आपण या शांततेचं प्रतीक, एक आठवण म्हणून दोघांना एकत्र घेऊ. पेंटिंग मध्ये दोन्हीही शांततेची प्रतीकं ‘पाणी’ आणि ‘कमळ’ असा एक छान निसर्गाच्या सानिध्यात गौतमबुद्ध आपली ध्यानसाधना करत आहेत असा विषय सुचला अन हे छानसं, एक अविस्मरणीय चित्र तयार झालं. आकाशाच्या सावलीत अन प्रतिबिंबामध्ये कमळाच्या विळख्यात शांत पाण्यात, शांत प्रतिमा खूप छान वाटलं अन पेंटिंग कडे पाहिल्यानंतर शांतता भासली.

अन तुम्हालाही शांतता मिळेल या चित्राकडे पाहिले की याचा मला विश्वास आहे.

प्रकाश मोहित – कोल्हापूर
८१४२८४६३५५

The silent watcher

Photo by James Lee on Unsplash

Award winning poem by Anam Shaykh

I was there, the silent watcher,

Counting my fate in my head,

I knew nothing about the events in and out,

But I still had a clue somehow.

What I knew was either I win , or I lose,

But I wasn’t sure of cues it threw,

I thought I was fine, I will go for it,

But then I questioned, will it be worth it?

I am silent like the night ,

But I am screaming like the sea,

Desperately I wait for the end,

For it tells me if I stay or I leave . 

I hope someday the voices in me clear out,

For I stay , really stay there forever,

With no doubts, no clues, no questions in and out,

For  now I think I’ll settle as the silent watcher.

Watching my fate bloom or burning down.

दिवस क्र. १९ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

 १० एप्रिल २०२० 

काही बातम्या आपल्याला आनंद देतात की दुःख हे कळत नाही. हेच बघा. डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीचे कोरोनाच्या आर्थिक क्षेत्रातील परिणामामुळे एक-तृतीयांश अवमूल्यन झाले असून आज घडीला त्यांची संपत्ती ३.१ बिलीयन डॉलर्स ऐवजी २.१ बिलियन डॉलर झाली आहे. मार्च १ पासून मार्च १८ पर्यंत केवळ जेमतेम दोन आठवड्यात हा परिणाम झाला आहे.

कोरोना चे जगाच्या वेगवेगळ्या देशांवर वेगवेगळे परिणाम होत आहेत. चीनने कुत्र्यांचे वर्गीकरण ‘पशू’ ऐवजी ‘निष्ठावान पाळीव प्राणी’ असे केले आहे. फेब्रुवारीमध्ये चीनने कोणत्याही प्रकारच्या वन्यप्राण्यांच्या खाद्य म्हणून वापरावर बंदी घातली होती. चीनमधल्या मधल्या वुहान मधल्या जिवंत प्राणी बाजारातून करण्याची सुरुवात झाली असे सुरुवातीच्या रुग्णांवरून लक्षात आले होते. याबाबत चीनवर प्रचंड टीकाही झाली होती. चीनमध्ये वर्षाला एक कोटी कुत्री आणि ४० लाख मांजरांची कत्तल होते खाण्यासाठी. आता कुत्री वाचतील अशी आशा निर्माण झाली आहे

न्यूयॉर्कमधूनही धक्कादायक बातमी आली आहे. शहराच्या हार्ट बेटावर असणार्‍या दफनभूमीत मोठाले खड्डे खणण्यात आले असून त्याचा करुणा मुळे मृत झालेल्या रुग्णांसाठी सामूहिक दफनभूमी म्हणून वापर करण्यात येत आहे. ज्या मृत व्यक्तींच्या देहा वर कोणीच हक्क सांगत नाही अशा मृतदेहांचे इथे दफन होते. साधारणतः इथं आठवड्याला २५ मृतदेह यायचे आता कोरोना काळात ही संख्या दररोज २४ अशी आहे. हे मृतदेह अशा पद्धतीने शवपेटीत दफन केले जात आहेत की पुढेमागे नातेवाईकांना हवे असेल तर तो देह त्यांना हस्तांतरित करता येईल. कोरोनाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन दुषित असण्याचे कारण एकदा हॉस्पिटलमध्ये गेलेल्या रुग्णाला भेटण्याची परवानगी कुणालाच नसते. आणि मृतदेह पूर्णपणे निर्जंतुक प्लास्टिकच्या पोत्यात टाकुन त्याची विल्हेवाट लावावी लागते. साताऱ्यात अशा एका कोरोना ग्रस्त मृत व्यक्तीच्या दहन संस्काराची व्हिडीओ क्लिप पाहिली. दहन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही प्रचंड काळजी घ्यावी लागते.

कोरोनाचे आकडे जाहीर करण्याच्या बाबतीत आपला व अमेरिकेचा दृष्टिकोन दोन समाजांमधला फरक स्पष्ट करतो. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कोरोना च्या प्रभावाने दोन-अडीच लाख लोक अमेरिकेत मरण्याची शक्यता आहे असे घोषित केले. ते हे ही सांगायला विसरले नाहीत की मृतांची संख्या या संख्येवर रोखणे याचा अर्थ अमेरिकेने (पर्यायाने मी) खूप चांगले काम केले आहे असा होतो. याउलट भारतात अजूनही ‘कोरोना चे सामूहिक संक्रमण अजून होत नाही’ असे सांगण्याकडे कल आहे. आपल्या रुग्णांची व मृतांची संख्या कमी आहे असे सांगताना किंवा ऐकताना आपल्याला चांगले वाटते त्यामुळे खरी संख्या आपण सांगत नाही असे अनेकांचे मत आहे. अमेरिकेची पारदर्शकता टोकाची आहे तर आपली अपारदर्शकता? काही असो आज ना उद्या खरे आकडे बाहेर येतीलच.

दिवस क्र. १८ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

९ एप्रिल २०२०

उद्योजक किरण शॉ मजुमदार यांचा भारतातल्या निवडक स्पष्टोक्त उद्योजकांपैकी सर्वात अग्रक्रम आहे. त्यांनी भारतातील कोरोना केसेस जितक्या जाहीर झाल्यात त्यापेक्षा चार पट असाव्यात असे वक्तव्य केले आहे. याशिवाय त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ‘खाजगी कंपन्यांनी सुद्धा कोरोना चाचण्या मोफत कराव्यात आणि शासनाने त्याचे पैसे द्यावेत’ या निर्णयावर तो अयोग्य असल्याची टीका केली आहे.

न्युझीलँड ची ही घटना प्रशासन संकट काळात कसे चालवावे याचे उत्तम उदाहरण आहे. तिथल्या आरोग्य मंत्र्याची पदावनती केली आहे. डॉक्टर डेव्हिड कुर्क या आरोग्यमंत्र्यांनी स्वतः लॉकडाऊनच्या निर्बंधांचा भंग करून वीस किलोमीटर दूर असलेल्या समुद्रकिनाऱ्याला कुटुंबीयांसमवेत भेट दिली. त्यापूर्वी एकदा आपल्या बाईक वरून दोन किलोमीटर जाऊन त्यांनी नियमभंग केला होता. मात्र त्यांनी या प्रकाराबद्दल माफी मागितली व स्वतःला मूर्ख म्हणून संबोधले. पण प्रधानमंत्री आरर्डेन यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही पण त्यांची पदावनती केली. त्यांच्याकडून मंत्रालय काढून घेतले. त्यांनी कोविदचे संकट टळल्यानंतर ‘आरोग्यमंत्र्यांना किंमत द्यावी लागेल’ असेही जाहीर केले.

कोविद ने सर्वत्र धुमाकूळ माजवला आहे हे मात्र खरे. जगभर १५ लाखांवर रुग्ण घोषित. भारतात ही संख्या सहा हजार पाचशेच्या आसपास आहे. शंभरपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सौदी अरेबियाच्या शाही कुटुंबातील 150 जणांना विलगीकरण आत ठेवण्यात आले आहे. दिल्लीत आणि नोएडात दहापेक्षा अधिक हॉटस्पॉट जाहीर करून त्या भागांची संपूर्ण नाकेबंदी करण्यात आली आहे. आमच्यापासून केवळ तीन किमीवर निजामुद्दीन हा हॉटस्पॉट आहे.

सध्या एप्रिल १४ नंतर कुलूप बंदीची मुदत वाढ होणार की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. ओडिशाने ३० एप्रिल पर्यंत मुदत वाढ केली आहे. संक्रमणाचा विस्तार पाहता केंद्र सरकारही देशव्यापी मुदतवाढ जाहीर करण्याची शक्यता आहे. या दरम्यान ऑलिम्पिक सहीत अनेक आंतरराष्ट्रीय व आंतर्देशीय सामने रद्द करण्यात आले आहेत.

दरम्यान झूम द्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करण्यावर जोर वाढला आहे. काल मी झूम वर विद्यार्थ्यांची संवाद साधला. शिवाय चांगुलपणाच्या थाळीवरही चर्चा केली.

Baramati Corona Helpline

पुणे, इतर महाराष्ट्र बरोबरच आता बारामती मधून पण येणारी माहिती वेगळ्या पणा वर संचित करत आहोत .

कोरोना व्हायरसशी दोन हात
चीन मधील हुआण शहरातुन या आजाराची सुरुवात झाली. पाहता पाहता या आजाराने संपूर्ण जगाला म्हणजेच 150 पेक्षा जास्त देशांना आपल्या आवेशात घेतले. आज संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचे सावट निर्माण झालेले असताना आपला देश कसातरी झटपट करीत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करीत होता परंतु या कोरोना व्हायरस नावाच्या आजाराने भारतालाही विळखा घातला. पाहता पाहता संपूर्ण भारतात हा आजार पसरू लागला सरकारने संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केले. कोणालाही घरातून बाहेर पडण्याची मुभा नव्हती. फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू होत्या त्यातही महत्वाचे म्हणजे हॉस्पिटल, मेडिकल आणि किराणा दुकान एवढेच. लोकांचे सरकारी जॉब, प्रायव्हेट कपंन्या, मॉल, बाजारपेठा, इतकेच काय तर रोजगारावर आपले पोट भरणाऱ्या लोकांना ही घरातच बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. अशा लोकांनी पैसे रोजगरच नाही तर त्यांनी पैसेकोठून आणायचे आणि आपल्या पोटाचे खडगे कसे भरायचे हा खूप मोठा प्रश्न आपल्या देशापुढे आ वासून उभा होता. अशातच काही होतकरू संस्था माणुसकी म्हणा किंवा सामाजिक बांधिलकीतुन पुढे आल्या आणि त्यांनी आपल्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी उचलली. अशीच एक श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ बारामती म्हणून संस्था आहे त्यांनी आपला सेवाभाव दाखवून या कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यास खूप मोलाचे योगदान केले आहे. ही एक सामाजीक संस्था असून समाजातील वंचीत घटक, गो सेवा नैसर्गिक आपत्ती यासारख्या अनेक क्षेत्रात मोलाचे काम करीत आहे. या संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र मोदी यांनी संस्थेच्या सर्व सभासदांशी चर्चा करून या कोरोना व्हायरस सारख्या घातक महामारीला तोंड देण्याचे ठरवले. बारामती मधून जयेंद्र मोदी, पी. टी गांधी, रमणिक मोता, सचिन बोरा, दिलीप दोशी, मेहुल दोशी, सुमित बोराणा, निलेश मुथा, योगेश मुथा, नितीन भंडारी, तनय गुगळे, साहिल शहा, प्रविण मुथा यांनी कामला सुरुवात केली, त्यांनी त्यांच्या समाजातील लोकांना मदतीचे आवाहन केले आणि बघता बघता एका दिवसात 2,00,000/- (दोन लाख) रुपये निधी गोळा केला. या निधीतून ते बारामतीतील गरजू लोक बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून बारामती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अहिंसा भवन येथे रोज दुपार आणि संध्याकाळचे जेवणाचे डबे देण्यास सुरुवात केली. रोज अंदाजे 500 डबे दिले आहेत आणि आत्तापर्यंत अंदाजे 6000 डबे दिले आहेत तसेच लॉक डाऊनमुळे माणसाचे ज्याप्रकारे हाल चालू आहेत तसेच मुक्या प्राण्यांचेही चालू आहे या सजीव सृष्टीत त्यांनाही आपल्यासारखाच जगण्याचा हक्क आहे या भावनेतून या संस्थेने रोज मुक्या प्राण्यांना (मांजर, भटकी कुत्रे, गाय) पोट भरेल असा आहार देत आहेत. या संस्थेने कुठल्याही प्रकारची जाहिरात केली नाही, बारामती नगरपालिका तसेच तहसील कचेरी फक्त यांनाच या योजनेची माहिती दिली होती आणि व्हाट्सअप्प वर मेसेज पाठवला या संस्थेचे हे काम पाहून बारामती मधील बरेच उद्योजक आणि होतकरू तरुण या संस्थेशी संपर्क साधून संस्थेला मदत करीत आहेत. या संस्थेचे हे काम पाहून समाजातील इतर घटकांनीही विचार करण्याची गरज आहे. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्यांनीही पुढे आले पाहिजे. श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ यां संस्थेनी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी संपूर्ण भारतातून जैन समाजाने अंदाजे अडीजशे कोटी रुपये निधी म्हणून गोळा केलेला आहे. जोपर्यंत कोरोना व्हायरस पूर्णपणे नामशेष होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवू तसेच जनतेने विनाकारण घरातुन बाहेर फिरू नये. सरकारच्या वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे पालन करून सरकारला सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष श्री पी. टी गांधी यांनी केले.
जर कोणाला जेवणाची गरज असेल तर खलील नंबर वर संपर्क साधावा.

  1. पी. टी गांधी : 9850958531
  2. सचिन बोरा : 9850640640

‘अंधारी’ दरीतली हिरवी सकाळ…

पियुषा प्रमोद जगताप –

लेखिका भारतीय वन सेवेतील (IFS) तुकडी-२०१४ अधिकारी असून सध्या मेळघाट वन्यजीव विभागात कायर्रत आहेत. या पोस्ट मधील छायाचित्रे पियुषा यांनी स्वतः टिपलेली आहेत.

उन्हाळ्याची चाहूल यंदा तशी उशीराच लागत आहे. होळी संपून आठवडा झाला तरी अद्यापही विदर्भातील हवा अजून म्हणावी तशी तापली नाहीये. दर वर्षी प्रमाणे मार्च महिन्याची धामधूम, त्यात अजून हे corona चं लोण सगळीकडे पसरत चाललेलं. शेवटी मनाची हय्या करून, बाहरे पडायचंच असा पक्का निश्चय करून आज सकाळीच निघालो, जवळच, घाटांग रस्त्याला. सकाळी सहाची वेळ. तांबडं फुटलं तरी सूर्योदय अद्याप व्हायचाच होता. हवेत मस्त गारवा होता. लेकीची गुलाबी झोप मोडू नये म्हणून तिची पाळण्यात रवानगी करून आम्ही निघालो. पाळण्याची दोरी अर्थात तिच्या आज्जीच्या हाती देऊनच!

कुसुमाच्या झाडाची नवी पालवी…

घटांग पासून पुढे थंडी जरा जास्तच जाणवायला लागली. त्यातच आम्ही नियोिजत ठिकाणी पोचलो. हे ठिकाण धारणी-परतवाडा मुख्य रस्त्यालगतच्या एका वळणावर होतं. गुगीर् पूल त्याचं नाव. अनेकदा या रस्त्याने जाताना ठरवलं होतं या दरीत कधीतरी उतरायचंच.

आज तो योग जुळून आला. सपना नदी खोर्‍यातली ही दरी. एका बाजूला प्रिसध्द गिरीस्थान चिखलदरा तर दुसर्‍या बाजूला तितकीच उंच माखल्याचे पहाड. आणि मध्ये सिपनेच्या विस्तीर्ण खोर्‍यातली, दुतर्फा जंगलाने वेढलेली ही एक दरी! पानगळीच्या सागाच्या जंगलाला अपवाद अशीही जागा. सदाहरित. दरीच्या माथ्यावर एकीकडून वळणा वळणाचा मुख्य रस्ता तर दुसरीकडून एक नैसर्गिक रोपवन. याच ठिकाणी तीन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर बांबूच्या झाडांना फुलोरा आला होता. त्यानंतर बीज तयार झाल्यावर बहुतांशी बांबू बेटं सुकून गेली होती. दरीत उतरतांना समोर अस्वल आलं तर काय हा नेहमीचा प्रश्न मनात ठेवून सुरवात केली. शासकीय दौरा असल्याने आठ जणांचा चमू सोबत होताच.

हिरडा-झडी (जिथे हिरड्याचं झाड उभं आहे तिथून ) आम्ही उतरायला सुरुवात केली. उतार विशेष नव्हता, साधारण शंभर मीटर चालत गेल्यावर आम्ही अंधारी नाल्याच्या प्रवाहात जाऊन पोचलो. हा या दरीचा मुख्य नाला. उन्हाळा असूनही अद्यापही पाणी वाहत होतं. आम्ही पाणी चुकवत गोट्यांवरून उड्या मारत मारत चाललो. ऊन आलं असलं तरी खाली पोचत नव्हतं . पण दरीत येणारं एक प्रकारचं दडपण इथे येत नव्हतं. कुं द हवा वा हत होतीच . नाल्याभोवती मोठी आंब्याची झाडं डौलात उभी होती. कमीत कमी 20 ते 22 मीटर उंचीची ती झाडं अवघं आकाश व्यापून टाकत होती. सहज म्हणून एका झाडाची गोलाई मोजली तर ती किमान अडीच मीटर भरली. अजून एकाची मोजली तर तब्बल साडेचार मीटर घेर असलेला तो भव्य आम्रवृक्ष होता. आंब्याच्या खाली भरपूर प्रमाणात आंब्याची रोपटी उतरलेली होती. सशक्त जंगलाचं एक महत्वाचं लक्षण! आंब्याची झाडं सदाहिरत असल्याने हिरव्यागार पानांनी डावरलेली होती. काही फांद्यांना नवी पालवी फुटलेली होती. रानडुकराने खाऊन टाकलेल्या मागच्या वर्षीच्या कोयींचें अवशेष अजून दिसत होते. त्यावरून एकूण फळ लहान असावं आणि खूप प्रमाणात येत असावं हे जाणवत होतं. मेळघाटात इतक्या मोठ्या प्रमाणावर इतकीमोठी आंब्याची झाडं मी पहिल्यांदाच पाहत होते. प्रत्येक झाडाला एक व्यक्तिमत्व असतं असं माझं ठाम मत असल्याने, अश्या व्यक्तिमत्त्वांना जवळून पाहण्याचा, त्यांचा सहवास अनुभवण्याचा आनंद काही औरच असतो. त्यात आंबा हा पुरातन काळापासून मांगल्य, सुफळसंपूणर्तेचं प्रतीकआहे. परंतु यंदा आंबा म्हणावा तसा फुलाला नव्हता.तरीही त्याची पालवी प्रसन्न करणारीच होती.

अंधारीनाल्याच्या दुतर्फा आंबा आणि जांभळाचे दाट गर्द दिसत होती. दरीत बर्‍यापैकी खाली उतरल्यावर एका ठिकाणी पाण्याचा आवाज कानावर पडला. थोडीशी वाट वाकडी करून एका धबधब्याजवळ पोचलो. गुिगर् पुला खालून वाहणार्‍या नाल्याच्या हा तयार झालेला धबधबा.

गुर्गि धबडबा

धबधब्याच्या परिसरात मोठे वाढलेले गवत दिसत होते. ते बहुदा हत्ती गवत असावे. त्याला छान फुलोरा आला होता. वाटेवर उगवलेले नेचे (फर्न) अजून हिरवेगार होते. नाल्याची आता ‘अंधारी नदी’ झाली होती. इतक्या वेळ केवळ पाटा (खडक) असल्याने न दिसणारे प्राण्यांचे ठसे आता मधून मधून वाळूच्या पट्ट्यात उमटलेले दिसत होते

 गवे, सांबर, भेडकी, अशा तृणभक्षी प्राण्यांच्या खुरांची तुलना करत त्यांचे फोटो घेत आम्ही पाटा नाल्याजवळ आलो. अंधारी नदीला मिळणारा हा नाला सरळ दरीत उडी घेत होता. त्याला वाहतं पाणी नसलं तरी पावसाळ्यात मोठा धबधबा होत असणार इथे. त्याच्या पायथ्याला डोहात मात्र अजून पाणी साठून होते. नदी पात्र आता थोडं रुंदावलं होतं. आंबा व जांभूळ यांच्या सोबत अर्जुनही दाटीवाटीने उभे होते. काही ठिकाणी वडाच्या पारब्या नदीवर ओणावल्या होत्या. खाली थंड, स्वच्छ, नितळ पाणी वाहत होतं.

पारब्या बांधून झोका बनवावा असं एकदा मनात आलं पण माझ्या! चित्रपटातील नायिकेने त्यावर बसून झोका घेतल्यास तिच्या पायाने पाण्यावर अजूनही तरंग उमटावेत असं हे ठिकाण. पण निसर्गाची रचना बदलून पाण्याकडे धावत निघालेल्या त्या कोवळ्या मुळांना बांधून ठेवण्याचा विचार मी ताबडतोब झटकून टाकला. जंगल भ्रमण केल्यावर काही काळा नंतर तुम्हाला गोष्टी फक्त पाहत राहव्याशा वाटतात.

अर्जुन

त्यात बदल करावा, निसगार्च्या नियमात हस्तक्षेप करावा असं नाही वाटत. लहानाहून लहान गोष्टीमागे काहीतरी करण असतं. निसर्गातील प्रत्येक गोष्ट हा छोटासा चमत्कारच असतो आणि तो दुरून पाहणे व समजून घेणे यातच खरा आनंद असतो.

साधारण तीन किलोमीटर चालल्यानंतर धामणीकुंडीनाला आडवा आला. त्यात सलग पाणी वाहत होते. खडकात डोह तयार झालेले होते आणि खाली-वर असणार्‍या दोन डोहांना पाण्याचे ओहोळ जोडत होते. पाणी घसरगुंडी खेळत असावे असा हा भाग होता. सलग, शांत, नितळ. पूर्वी फुलोरा येऊन गेलेल्या बांबूच्या सुकलेल्या रांझी पांढर्‍याशुभ्र दिसत होत्या. त्यांच्या भोवती बांबूची असंख्य पिल्ले पसरलेली होती. त्यातली सशक्त रोपांचे कालांतराने नवीन रांझीत रूपांतर होईल.

सुकलेल्या बांबूचे एक खोड मातीतून बाहरे आलेले होते. पावसाने स्वच्छ धुऊन निघाल्याने नैसर्गिक काष्ठिशल्पच वाटत होतं ते. त्यावर वाढणार्‍या लाखेच्या किड्यासाठी प्रसिद्ध असणारी कुसुम ची झाडं नव्या पालवीने नटली होती. लाल-लाल पानं वार्‍यावर डोलत होती. दरीत वाहतं पाणी, हवा आणि पाखरांचा नादमधुर स्वर गुंजत होता. वातावरण भारावल्यासारखे झाले होते.


इतक्यात वरून दोन मोठी घुबडं आमच्या चाहुलीने उडत उंच अर्जुनावर जाऊन बसली. फीश आऊल प्रजातीची ती होती. थोडंस पुढे गेल्यावर कोतवाल (रॅकेट टेल्ड ड्रॉणगो) आणि ट्री-पाय यांची पकडा-पकडी सुरू होती. पोपटांचे थवे इकडून तिकडे उडत होते. एक छानसं पोपटाचं पीस मला सापडलं. बहुदा शेपटीचं ते असावं असा माझा अंदाज. हिरवा निळा तपकिरी असा चमकदार रंग असलेलं ते पीस मी हलके च एका ब्रॅकेट मश्रूम मध्ये खोवलं. हे मश्रूम लाकडी कडक प्रकारातले एक.

ब्रॅकेट मश्रुम

पावसाळा नसूनही कुजक्या तुटक्या फांद्यावर वाढणारं.  त्याचा एक छानसा फोटो काढून आम्ही पुढे निघालो.

आम्रा नाला ओलांडून आम्ही पुढे पुढे चालत रािहलो. कधी नदीपात्रातून तर कधी बाजूच्या जंगलातून. आता हळू हळू रायमुनिया अथार्त घाणेरीचे प्रमाण वाढत चालले होते. साधारण पंचवीस तीस मीटरवर झडुपं सळसळ करत होती. आम्ही सावध झालो. कानोसा घेत स्तब्ध उभे रािहलो. तेवढ्यात एक मोठा गवा समोर चालत गेला. त्याच्या मागे दोन अजून पिल्लं त्याच वाटेवरून गेले. गव्यांचा कळप बहुदा आसपास चरत असावा. आम्ही तडक तिथून पावलं उचलली. अस्वलाची विष्ठा ठिकठिकाणी सापडत होती. नुकत्याच संपत आलेल्या रायमुनियाच्या छोट्या छोट्या काळ्या गोड फळांचा त्याने फडशा पाडलेला स्पष्ट दिसत होता.


मोठ्या झाडांची अजब सरिमसळ इथे पाहायला मिळत होती. अर्जुन बहुतांश ठिकाणी यजमान (होस्ट) चे काम करत होता. त्याच्या पांढर्‍या तुकतुकीत खोडामध्ये वड, आंबा, जांभूळ, अगदी रायमुनीय सुद्धा वाढलेला दिसत होता. एका ठिकाणी तर आंबा आणि अर्जुनाची झाडं एकमेकांना बिलगून एक होऊन गेली होती. साधारण अडीच मीटर गोलाईचं एक आंब्याचं आणि एक अर्जुनाचे झाड, त्यांच्या फांद्या आडवी कलमं केल्यासारख्या एकमेकांना जोडल्या गेलेल्या, किमान चार ठिकाणी. शिवाय जोडच्या ठिकाणी घेर साधारण पाऊण ते एक मीटर! सयामी जुळी (काँजॉइन्ट ट्विन्स) असावीत अशी ती झाडं! एक काळं एक पांढरं! लहान मूल जसं नवीन गोष्टी पाहून हरखून जातं तसं काहीसं माझं मनातल्या मनात झालं होतं.

आंबा आणि अर्जुन

पुढे चक्र गोटा नावाचा नाला येऊन अंधारीला भिडला. हे सर्व नाले डाव्या बाजूनेच नदीला मिळत होते. आता नदीपात्र कोरडं झालं होतं, पण जमिनी खालून, लहान-मोठया गोट्यातून, छुपा प्रवाह वाहत होताच. मधूनच पाणी दिसे मधूनच पूर्ण गायब होऊन जाई. चिकरगोट्याच्या डोहात दीड पुरुषभर पाणी होतं. त्यात पुलासारख्या दोन कपारीत अडकलेल्या शिळेवर उतरून आम्ही बांबूच्या साह्याने त्याची खोली मोजली. त्यातही संततधार वाहतं पाणी होतं. समोर दोन मोठे मधुबाज (हनी बझडर्) आपले पंख पसरवत उडत गेले. उंच सागाच्या झाडावर जाऊन बसले.

चीकर गोठा


पाणी पाहून आम्ही देखील थोडी विश्रांती घेतली. नेमकाच माझ्या बुटाचा चिटकावलेला तळ निघून आला होता. तब्बल पाच वर्ष  त्याने अविरत सेवा दिल्यानंतर आता त्याची मरम्मत करायची वेळ आली होती. सात किलोमीटर अंतरा नंतर बूट-मोजे काढून पायाला पाण्याचा स्पशर् स्वगर्वत वाटत होता. नदीचा तळ स्पष्ट दिसत होता. लहान लहान मासे आणि पाण-निवळ्यांचे थवे इकडून तिकडे पोहत होते. निवळयां सोबत पाण्यावर तरगंणारे कोळ्या सारखे कीटकही होतेच. भक्षकांची दिशाभूल करण्याची त्यांची कला काही औरच असते. हे किटक केवळ पायाची टोके पाण्यावर टेकवतात, पाण्याचे सरफेस टेन्शन वापरून त्यावर चक्क चालतात. त्यांची सावली मात्र पाण्याच्या तळाशी मोठ्ठी पडते. प्रत्येक पायाभोवती एक वलयांतीक वर्तुळ असा एखादा ड्रोन कॅमेरा पाण्यात फिरावा तशी ही सावली दिसते. प्रत्यक्षात तो कीटक मात्र त्यापासून थोडा दूर जवळपास पाण्यात नसल्या सारखाच वाटतो. पाहणार्‍याचं लक्ष सगळं त्या सवलीकडे जातं. सोबत आणलेल्या चिवड्याचा नाष्टा करून पोटभर स्वच्छ पाणी पिऊन कुठलाही कचरा मागे राहणार नाही याची काळजी घेत आम्ही पुढे निघालो. पुढचा अर्धा अधिक किलोमीटर प्रवास बिगर बुटाचा करावा लागला.

सुखलेल्या बांबू चे खोड.

पूर्वी अनवाणी चालायची असलेली सवय आता पार मोडल्याची जाणीव झाली. त्या दरीतून आता आम्ही बाहरे पडत होतो. अंधारी नदी सिपनेच्या पत्रात जाऊन मिळत होती. हा भाग बराचसा चराई झालेला, माणसांचा वावर असलेला जाणवत होता. उन्ह डोक्यावर आलं होतं. त्या सुंदर दरीतले ते सूक्ष्मवातावरण (मायक्रो क्लाइमेट) आता संपलं होतं. आम्ही मुख्य रस्त्याला पोचलो होतो. भर उन्हाळ्यात साडेसात किलोमीटर आणि काही तासांचा हा सुंदर हिरवागार अनुभव सोबत घेऊन आम्ही परतलो.

अंधारी pdf

All photos and text ©Piyusha Jagtap

दिवस क्र. १७ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

८ एप्रिल २०२०

बाळासाहेब माळी. वय साधारण ५५-६० वर्षे. गाव हेरवाड. तालुका शिरोळ जि.कोल्हापूर. नुकतेच त्यांनी लावलेली दीड एकर मधील सिमला मिरचीचे पीक हातात आले. पण हातात आले कुठे? कोरोना मुळे आलेल्या लॉकडाऊन मुळे त्यांचे हातात आलेले पीक गेले. काही महिन्यांपूर्वी महापूर. आता कोरोना. त्यांचा आक्रोश स्थानिक टी. व्ही. च्या स्क्रीन वरती मावत नव्हता. ‘उसाच्या पिकाला अठरा महिने लागतात म्हणून पिकात बदल केला. चारेक लाख खर्च केले. कष्ट घेतले. पीक उत्तम आले पण काय उपयोग. पीक काढायला माणसं नाहीत. बाजारात घेऊन जाता येत नाही. लोक येऊन घेऊन जाऊ शकत नाहीत. शासन खरेदी करत नाही. फुकट वाटू शकत नाही. ८-१० लाखाचे नुकसान झाले.’ शेवटी त्यांनी दीड एकराच्या संपूर्ण  पिकावर नांगर फिरवला व ते नष्ट केले. शेतकऱ्यांची शोकांतिका कोविद-१९च्या चर्चेत सगळ्यात शेवटी येते हे दुर्दैव आहे. उद्योगाच्या पुनर्वसनाएवढेच शेतीच्या भविष्याविषयी नियोजन केले नाही तर बाजारातील भाव कडाडल्याशिवाय राहणार नाहीत. आजही शेतीमाल थेट शेतातून ग्राहकांच्या घरी यावा यादृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही. लॉकडाऊनमध्ये जनता खाणं-पिणं थांबवत नसेल तर शेतकऱ्याला त्रास न होता त्याचं पीक, भाजीपाला, दूध यांची खरेदी सुलभ करण्याला प्राथमिकता द्यायला नको का?

या पार्श्वभूवर ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात रामायणाचा संदर्भ देत, ‘ज्याप्रमाणे रामाचा बंधू लक्ष्मण याचा प्राण वाचवण्यासाठी हनुमानाने हिमालयातून औषधी बुटी आणली, ख्रिस्ताने आजारी लोकांना बरे केले आणि अंधांना दृष्टी दिली त्याप्रमाणे भारत आणि ब्राझील एकत्र येतील, वैश्विक संकटावर मात करतील’. राष्ट्राध्यक्ष बॉलसो नारो यांनी भारताच्या औषधांचा पुरवठा चालू ठेवावा अशी विनंती पंतप्रधानांना केली. संकटाच्याकाळी मदत करण्याची क्षमता भारताकडे आहे ही फार चांगली गोष्ट आहे. 

दरम्यान अमिताभ बच्चनचा एक लघुपट व्हायरल झाला आहे. चित्रपटात अमिताभ आपला गॉगल शोधताहेत या धाग्यावर कथा बेतलेली आहे. प्रियांका चोप्रापासून रजनीकांत, रणवीर कपूर, आलिया भट, दक्षिणेकडचे अनेक नामवंत कलाकार आहेत. शेवटी गॉगल सापडतो. पण या लघुपटाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाही कलाकाराने चित्रीकरणासाठी आपले घर सोडले नाही. कोविद-१९ च्या सावलीत घरात थांबूनही सर्जनशील व क्रियाशील राहता येते हाच संदेश या चित्रपटातून अप्रत्यक्षरित्या दाखवला गेला आहे. आपले घर म्हणजे सीमा न होता एक नवे क्षितिज होऊ शकते – निर्मितीचे अंगण!

दिवस क्र. १६ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

७ एप्रिल २०२०

‘लॉकडाऊन संपल्यानंतर लोक विभक्त होतील, घटस्फोटाचे अर्ज वाढतील आणि गरोदर महिलांची संख्या वाढेल’ असं एका इटालियन लेखिकेनं ‘तुमच्या भविष्यातून’ लिहिलेल्या पत्रात म्हंटलं आहे. तिच्या भविष्यावरच्या भाष्यात तिनं लॉकडाऊन नंतर जग एका नव्या वस्तुस्थितीला सामोरं जाणार आहे असं म्हंटलं आहे. मला मात्र वाटतं की, आर्थिक क्षेत्रातील काही अपरिहार्य परिणामांचा सामना सोडला तर जग पुन्हा आपल्या वळणावर जाईल. तितकंच महत्वाकांक्षी, तितकंच चंगळवादी, तितकंच गतिशील आणि स्वार्थी होणार आहे जितकं ते लॉकडाऊनच्या आधी होतं. 

आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कोरोना उगम आणि प्रसारातील चीनच्या भूमिकेविषयी व जबाबदारीविषयीची चर्चा नकारात्मक दिशेने जाण्याची शक्यता ५०:५० टक्के आहे. सध्या जगाची चीनविषयक स्थिती ही ‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’ अशी आहे. अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांनी जागतिक आरोग्य संघटनेवर तीर सोडून पहिली खेळी केलेली आहे. त्यांच्या मते संघटनेने ‘चीनकेंद्रित भूमिका घेतली व अमेरिकेला चुकीचा सल्ला दिला. सुदैवाने अमेरिकेने तो सल्ला ऐकला नाही आणि चीनकडून येणारी विमानवाहतूक थांबवली. लॉकडाऊन नंतर या गोष्टींची पडताळणी केली जाईल.’ 

सध्याचं जग हे किती परावलंबी आहे त्याचं आणखी एक उदाहरण. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कोरोनावर उपाय मानलं गेलेलं हैड्रोक्सिक्लोरोक्वीन या औषधाची मागणीवजा धमकी या औषधाचा जगातील सगळ्यात मोठ्या उत्पादक असलेल्या भारताला केली. ‘जर अमेरिकेला हे औषध निर्यात करण्यास बंदी घातली तर अमेरिका कारवाई करेल.’ अशी ही धमकी. भारताने आपले काही दिवसांपूर्वी लादलेले निर्यात निर्बंध रद्द केले. अमेरिकेला हे औषध पाठवले जाईल. गम्मत म्हणजे या औषधासाठी लागणारी जी औषधी द्रव्ये असतात ती भारत चीनमधून आयात करतो. आहे ना परस्परावलंबन. आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो फक्त आपल्या देशाचे हितसंबंध महत्वाचे असतात.’ 

या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील भिलवाडा या शहराने कोरोना संक्रमणाला थोपवण्यात मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. इथल्या २७ रुग्णांपैकी २० बरे झाले आहेत. रुग्ण असल्याचे कळताच राजस्थान सरकारने १६००० आरोग्य कर्मचारी पाठवले. कठोर सोशल डिस्टंसिंग, मोठ्या प्रमाणात चाचण्या, शहराची पूर्ण नाकेबंदी व यंत्रणेतील यशस्वी समन्वय हे या यशाचे गमक दिसते.   

दिवस क्र. १५ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

६ एप्रिल २०२०

काल ‘दिया जलाओ’ कार्यक्रम पार पडला. त्यावर आज अनेक प्रकारची टिप्पणी सोशल मीडियात पाहायला मिळाली. पण सर्वात महत्वाची कमेंट कोरोना व्हायरस कडून आली. ‘दोस्तो समझमे नाही आ राहा है की मै व्हायरस हूँ या त्योहार’ सामान्य माणसाची विनोदबुद्धी सामान्य नसते हेच खरे.

अतुल गोतसुर्वे भारताचे उत्तर कोरियामधले राजदूत. कोरोना व्हायरस संबंधी मी त्याच्याशी चर्चा केली. त्याला मी काही प्रश्न विचारले. त्याने दिलेल्या माहितीचा हा सारांश. ‘किम जोंग हा हुशार माणूस आहे. १ फेब्रुवारीपासून त्याने सर्व विमान वाहतूक थांबवली. १३ जानेवारीपासून चीनला गेलेल्या सर्वांचे विलगीकरण केले. आणि प्रत्येकाला मास्क सक्तीचा केला. सर्व विदेशी पर्यटक व नागरिक याना डिप्लोमॅटिक कुंपणाच्या आतच थांबण्याची सक्ती केली. १ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत दूतावासातील स्थानिक कर्मचाऱ्यांनाही दूतावासातच थांबवले. प्रत्येक दुकान आणि मॉलच्या प्रवेशावर सॅनिटायझरची व्यवस्था व सक्तीचा वापर.’ त्याच्या मते भारतात प्रत्येकाने घरी बनवलेला मास्क वापरावा व सध्याच्या परिस्थितीत मास्क व औषधे यांची निर्यात करावी. उत्तर कोरियात आत्तापर्यंत एकही कोरोना पीडित रुग्ण नाही.

सरकारची व राज्य प्रशासनाची कसोटी इथून पुढे लागणार आहे. पण खरा विचार करायचा तर ही कसोटी आपल्या आरोग्य व्यवस्थेची, प्रशासकीय गुणवत्तेची आणि सामाजिक एकजुटीची परीक्षा आहे. आपण ७० वर्षात लोकशाही बरोबरच अर्थव्यवस्था, शासकीय संस्था, निर्णय प्रक्रिया या कशा प्रकारे विकसित केल्या आहेत त्याची ही सत्वपरीक्षा आहे. कोरोना संकटात सर्वात खालचा बिंदू भारतात अजून आलेला नाही. शिवाय ही लढाई किती काळ टिकेल आणि एकंदरीतच देशावरच (नव्हे तर जगावरसुद्धा) याचा किती विपरीत परिणाम होईल याची या क्षणी कुणालाच कल्पना नाही. ना भारताला ना अमेरिकेला. एक देश आणि समाज म्हणून आपण केलेल्या कार्याची अग्निपरीक्षा यानंतरच होणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान ,मंत्रीमंडळ व खासदारांच्या पगारात ३०% कपात आणि खासदार विकास निधी दोन वर्षे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे राष्ट्रपती , उपराष्ट्रपती व राज्यपालानी स्वागत करत स्वतःचा पगारही स्वेच्छेने ३०% कमी घ्यायचे ठरवले आहे.भाजपच्या अध्यक्षांनी भाजप कार्यकर्त्यांना एकवेळ भोजन करावे असे आवाहन केले आहे. ‘गो कोरोना गो’ ची रामदास आठवलेंची दुसरी क्लिप व्हॉटस अप विद्यापीठात फिरते आहे. बघूया काय काय वाढून ठेवले आहे ते!