विचारमंचा ची सुरुवात – वाचा, विचार मांडा.

Corona – a chance to reform.

कोरोना ने जगभरात सगळीकडे थैमान घातलं आहे. लोकं घरी बसलीएत, रस्ते, बाजारपेठा, कामगार वर्ग आणि एकूणच जीवनमान ठप्प झालंय. भारतासमोर, तरुण वर्गासमोरही खूप सारे अनोळखी आणि नवीन प्रश्न उभे ठाकलेत. या सगळ्या अनिश्चिततेच्या काळामध्ये बहुतेक प्रत्येकच व्यक्ती आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांमुळे काम-धंद्यांपासून ते स्वतःवर होणाऱ्या छोट्या-मोठ्या परिणामापर्यंत या सगळ्या नवीन वास्तवावर जाणीव-पूर्वक किंवा अजाणता सुद्धा विचार करत असेल. 

– मी आत्तापर्यंत जे काही काम करत होतो त्याला खरंच काही अर्थ आहे का?, मला ते आवडत होतं का? कि मी नुसतं डोळे मिटून सगळ्या गोष्टी करत होतो/होते? 

– कोरोना नंतर भारत आणि जग कसं असेल? अर्थव्यवस्थांच्या पटलावर काय लिहिलेलं असेल? 

– ‘कोरोना-नंतर’ असं काही असेल का? कि हा आपल्या जगण्याचा आता भाग असणार च आहे?

– छोटी-मोठी गावं, शहरं ते मोठ-मोठे देश, आत्तापर्यंत सवयीचं असलेलं जागतिकीकरण आणि स्वावलंबन याचा सुवर्णमध्य गाठतील का?

– उत्पादन आणि सर्व प्रकारची साधनसंपत्ती यावर या सगळ्याचा काय परिणामम होईल?

– तगड्या  आणि टिकाऊ गोष्टीची मागणी करणारा भारत, आपली गरज स्वतःच पूर्ण करेल का?

– नैसर्गिक गरजा भागविण्यापासून ते प्रगत-अतिप्रगत संस्कृतींपर्यंत पोहोचलेल्या माणसाच्या मनावर, विचारांवर आणि पर्यायाने संपूर्ण मानव संस्कृतीवर, आयुष्याच्या प्रत्येक अंगावर या सगळ्याचा कसा परिणाम होईल?

– आपलं ‘नवीन नेहमीचं’ आयुष्य कसं असेल? हेच आपलं नवीन वास्तव आहे का?

यासारख्या प्रश्नांची गणती सुद्धा शक्य नाही. एखाद्या काल्पनिक चित्रपटामध्ये शोभावी अशी सगळी दुनिया.. प्रत्येकाला काही ना काही वाटतंय; ते आपण वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या माध्यमांमधून व्यक्त करतोय, त्यावर प्रतिक्रिया देतोय आणि त्याला प्रतिसादही देतोय. भारतासारख्या तरुण देशातला तरुण सुद्धा एका टप्प्यावर येऊन थबकून विचार करतोय कि मी यात कशा प्रकारे सहभागी होऊ शकतो. 

म्हणूनच यासाठी एक Baramati.org नावाचे व्यासपीठ तयार केले आहे. अशी जागा कि जिथे असे सगळे प्रश्न, अशा असंख्य कल्पना लाखो तरुणांना एकमेकांकडून नवी उमेद आणि आशा देऊन जाईल. काहीतरी करूया या तरुणाईच्या ‘करू’ वृत्तीच्या धडपड्या आणि  सळसळणाऱ्या उर्जेला सृजनशीलतेची साथ मिळेल. 

म्हणूनच या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना Baramati.org वर आपले आणि आपल्या मुलांचे विचार शेअर करण्यासाठी मनापासून आमंत्रण देतो. 

आम्हाला तुमचं कोणत्याही प्रकारचं लेखन, चित्र, फोटो, व्हिडिओ WhatsApp केले तरी चालतील. आम्ही ते  संकेतस्थळावर प्रकाशित करू. सध्या website खूप साधी असली तरी, तुमचा early adaptors म्हणून यात सहभाग खूप मोलाचा ठरेल. 

सोबत आपल्याबद्दल संक्षिप्त माहिती जोडायला विसरू नका: नाव, कार्य बद्दल, व contact details (optional)

कृपया हि पोस्ट जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. 

दायगो – + 91 9764148789

प्राची : +91 90490 40091

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *