Baramti.org चा मराठी परिचय

सूक्ष्म जीवापासून विकसित झालेल्या जीवापासून, गुहेत राहण्यापर्यंत आणि तिथपासून आज पृथ्वीवरच्या प्रबळ सजीवांपैकी एक असा माणूस. आजूबाजूला उपलब्ध असलेल्या संसाधनांचा कायमच वापर करून माणसानेआयुष्याच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणाऱ्या नवनवीन कल्पना सत्यात उतरवल्या आहेत. त्यामध्ये मनुष्य जात म्हणून विकसित होत राहताना आपली सगळ्यांची मिळून एक सामूहिक विचारसरणी सुद्धा आपल्या प्रत्येकाबरोबरच कायम विकसित होत आलेली आहे. आजूबाजूला असणाऱ्या, आपल्यासोबत घडणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रत्येकाला नवनवीन कल्पनांची आणि त्यानुसार आपलं वास्तव घडविण्याची प्रेरणा देत आल्यात. आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काही सुचत असतं. मगाशी म्हटलेल्या सामूहिक विचारसरणीचा म्हणा किंवा आजूबाजूच्या गोष्टींचा आपल्यावरचा पगडा इतका जबरदस्त असतो कि आपल्या डोक्यात आलेल्या अनेक अफलातून कल्पनांना, विचारांना, अंतःप्रेरणेला आपण गुंडाळून ठेवतो आणि आजूबाजूच्या गोष्टींचं अंधानुकरण करत राहतो. त्यातही काही चूक किंवा बरोबर असं नाही, पण आपल्याला खरंचच जर आपल्या मूळ कल्पना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कुठेतरी मांडायला मिळाल्या, त्यावर काम करण्यासाठी लागणारा पाठिंबा आणि हिंमत मिळाली तर?! ‘कुठे घेऊन जातील या कल्पना आपल्याला किंवा आपण कल्पनांना?’ याचा विचार करणं हि सुद्धा एक कल्पनाच ठरेल!

एखादं लिखाण, एखादं चित्रं, फोटो किंवा गाण्याचा एखादा व्हिडिओ या स्वरूपात आपण आपल्या कल्पना मांडणार आहोत, छोटं-छोटं एक एक पाऊल टाकत जाणार आहोत. तयार आहात मग आपल्या डोक्यातील कल्पनांना वास्तवात आणण्यासाठी?!

प्राची, २८ मार्च २०२०, पुणे.

#betheart #artpreneur

१०० रुपये X १ लाख दाते = १ करोड रुपये

Covid १९ मुळे खूप लोकांवर आज बिकट परिस्थिती आलेली आहे. आणि आर्थिक मंदी चा पहिला परिणाम कला क्षेत्रावर होतो. Baramati.org च्या माध्यमातून आम्ही चित्रकारांना, कलाकारांना परत आपल्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करत आहोत. कलाकार आणि त्यांच्या कुटुंबाचा या अवघड परिस्थिती मध्ये निभाव लागावा, त्यांची प्रतिष्ठा राखली जावी म्हणून हे campaign आम्ही सुरु करत आहोत :
https://milaap.org/fundraisers/support-artist-with-their-livelihood

तुम्ही या कार्यासाठी कमीत कमी १००/- रुपये किंवा आणखी जास्त मदत करू शकता. हा उपक्रम जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहचवून कलाकारांसाठी जास्ती जास्त मदत गोळा करण्यासाठी मदत करू शकता. याविषयी अधिक माहिती वाचा पुढिल लिंक वर-


https://milaap.org/fundraisers/support-artist-with-their-livelihood

#crowdfunding #crowdfundingcampaign #fundraising #donate #support #covid #crowdfund #art #funding #charity #entrepreneur #crowdfundingproject #fundraiser #help #crowd #coronavirus #community

English Introduction to Baramati.org

From a single celled organism, life on Earth began and we human beings have come very far as one of the dominant species on the Earth. We as a species have designed and shaped our constantly evolving reality with new ideas which touch all the possible aspects of life. Along with our individual consciousness, our collective consciousness is also being evolved with changing times. Circumstances, contexts around us make us react, think, respond and express about it and in turn shape our realties accordingly. Each one of us has tremendous potential and it constantly pushes us to be manifested in some or the other way. But as mentioned earlier, the millennia old conditioning of our minds and changing circumstances, contexts so severely impact us that we consciously-unconsciously succumb to its pressures and blindly follow the footsteps of others by keeping our original ideas, thoughts, inner voices at bay. There is nothing wrong and right in this; but what if we get an opportunity and a platform to express our most original and valuable ideas? What if we get the much needed support and courage to work on those ideas? Where it would lead us would be another one fantastic idea to ponder upon!

So we are going to take small steps every now and then and share our ideas through all possible mediums such as, a write-up, poem, drawing, sketching, painting, a photo or a video anything! Buckle up for designing your own reality by expressing and incubating your ideas!

Update:

Covid affected Artists need your support to survive :


https://milaap.org/fundraisers/support-artist-with-their-livelihood

100Rs. X 1 Lac donors = 1 Crore Rs

Covid has taken a big toll on all of us. During any economical crisis, entertainment industry is first to suffer. At baramati.org we strive to enable full-time fine artists to stand back on their feet and support their families. We have started this campaign to restore the sustainability of fine artists

with dignity by acquiring their artwork with the money you donate : https://milaap.org/fundraisers/support-artist-with-their-livelihood

Please donate at least 100 Rs and more if you wish, in support of hundreds of artists. Also share it with you friends and families as much as possible.

Read more about this –


https://milaap.org/fundraisers/support-artist-with-their-livelihood

Prachi, 28 March 2020, Pune.

_________________________________________

Corona Helpline